Shiv Sena ministers : पदाधिकारी फाेडण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा बहिष्कार

Shiv Sena ministers : पदाधिकारी फाेडण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा बहिष्कार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुका ताेंडावर असताना शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद बाहेर आले आहेत.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे या बैठकीत जनमतावर प्रभाव टाकणारे कोणतेही मोठे निर्णय घेण्यात आले नाही.
राज्यात सध्या नगरपरिषद व नगरपंचायत निडवणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळे राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यातच भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी पळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड धुसफूस सुरू झाली आहे.शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीतूनच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर कथितपणे बहिष्कार टाकला.

आजच्या प्री-कॅबिनेटला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित होते. पण त्यानंतर झालेल्या कॅबिनेटला एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री पोहोचला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी भाजपकडून मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्यात येत असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Shiv Sena ministers boycott cabinet meeting, attempt to tear apart office bearers

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023