विशेष प्रतिनिधी
पुणे : “उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा मी उघड केल्यामुळे तुमचे मनसुबे उधळले आहेत का? तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढे आम्हालाही बोलवा बरं!” असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर केला आहे.
अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतल्याचा दावा सामंत यांनी केला होता. याला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, “प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमात तुम्ही शिंदेंमुळे तुम्हाला दखल मिळाल्याचे मान्य केले. पण कोकणात सर्वप्रथम तुम्हाला योग्य राजकीय स्थान दिले ते ठाकरेंनी. त्यानंतर तुम्हाला धुरंधर राजकारणी म्हणून उभे केले राष्ट्रवादीने. शिवसेनेत आल्यानंतर तुम्ही मुत्सद्दी राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध केले. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे गेलात.”
“उदयभाऊ, तुमची उपमुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा मी उघड केल्याने तुम्हाला त्रास झाला का? माझ्यामुळे तुमचे स्वप्न जगजाहीर झाले का? त्यामुळेच तुम्ही आजच्या मुलाखतीत माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे सांगत होतात. होय, माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली, भेट घेतली नाही… भेट झाली.”
“दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात चहासाठी बसल्यानंतर ही भेट झाली. माझ्या सोबत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते, बाजूला खासदार भगरे गुरुजी बसले होते आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार होते. ही भेट झाल्यानंतर मी सर्वप्रथम माझ्या पक्षप्रमुखांना माहिती दिली, हे तुम्हाला कदाचित माहित नसेल.”
अंधारे म्हणाल्या, “उदयभाऊ, आता तुम्ही तिथूनही फुटण्याच्या तयारीत आहात. आणि याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवताच तुम्ही कळवळलात. एक सहज घडलेल्या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदयभाऊ, तुमचा वार खूपच जड गेलाय. या निमित्ताने का होईना, माझं बोलणं तुम्हाला फारच जिव्हारी लागलं हे लक्षात आलं.”
अंधारे म्हणाल्या, “हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे. तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला आम्हालाही बोलवा बरं का!”
Udaybhau, Is Your Secret Dream of Becoming Deputy CM Exposed? Sushma Andhare Hits Back
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















