विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nana Patole मालकाची आणि धमकीची भाषा लोकशाहीत चालत नाही. जनता हा गर्व चूर करून टाकेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.Nana Patole
नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते.Nana Patole
यावर नाना पटोले म्हणाले की, राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा तिजोरीचा वापर पक्षीय स्वार्थासाठी करण्याचा अधिकार दिलेला नाही. विकासाच्या नावाने मतं मागण्याऐवजी सत्ता आणि पैशांची भाषा करणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याचे पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतःच्या अधिकारांची मिरवणूक करत फिरतात आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्ष आपली ताकद दाखवत जनतेसमोर गर्विष्ठपणे बोलतो. महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकले आहेत का? अशीच भाषा या लोकांकडून ऐकायला येते, असा कडवा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
लोकांनी निवडून दिल्याचा अर्थ नेता मालक झाला असा होत नाही. सत्तेत बसलेले लोक हे पाच वर्षांसाठी जनतेचे सेवक आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. पटोले यांचा आरोप असा की, सत्तेचा माज आणि गर्व इतका वाढला आहे की सत्ताधारी जनता सर्व सहन करेल, हे त्यांना गृहित धरलं आहे. जनता तुम्हाला सत्तेत बसवते, तशीच ती तुम्हाला खालीही खेचू शकते, असे पटोले म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. बावनकुळे यांनी, मी भाजपचा स्टार प्रचारक आहे, कितीही खर्च होऊ द्या, निवडणूक आयोगाला उत्तर देऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने भाजपच्या नेत्यांना सत्ता आणि पैशांचा माज चढल्याचे पटोले यांनी म्हटले. त्यांच्या मते, सत्तेच्या जोरावर पैसा जमा करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भाजपला सत्ता मिळाल्यावर एक प्रकारची सर्वशक्तिमानता वाटायला लागली आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत जनता त्यांचा हा माज उतरवेल, असा दावा पटोले यांनी केला.
“Arrogant, Threatening Tone Won’t Work, People Will Humble You,” Nana Patole Warns Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















