विशेष प्रतिनिधी
मुंबई: Dr Gauri Palve Garje मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. ,गर्जेची बहीण देखील गौरीला मानसिक त्रास देत होती. म्हणून या प्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जेच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये सत्य बाहेर आले पाहिजे, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केलेली नाही पण त्याला अटक करु असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, असेही त्या म्हणाल्या.Dr Gauri Palve Garje
गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, डॉक्टर गौरी पालवे गर्जे या आत्महत्या करण्यासारख्या नव्हत्या. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती काय आहे त्यांना जेव्हा मुलीच्या आत्महत्येविषयी कळाले तेव्हा ते एका लग्नात होते.ते पूर्ण रात्र प्रवास करत वरळी पोलिस ठाण्यात आले. त्यांना रुग्णालयात अशा अवस्थेत मुलीली पहावे लागले. यावर काय बोलावे मला कळत नाही.Dr Gauri Palve Garje
अंजली दमानिया म्हणाल्या की, पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर करायला वेळ लागला कारण त्यात तिने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. पण तिच्या वडीलांनी तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे आम्हाला माहिती नाही. पोलिसांनी तसे करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर पोस्टमार्टममध्ये जर हत्या केल्याचे समोर आले तर पोलिस 302 चा गुन्हा दाखल करणार आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत, अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे हेच पुन्हा पुन्हा म्हणून काय फायदा ही प्रकरणं महाराष्ट्रात वाढत आहेत. संपदा, गौरी आणि वैष्णवी ह्या सर्वांसोबत हे झाले. गौरी पालवे ही खूप खंबीर होती ती आत्महत्या करेल असे वाटत नाही. अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांचा पीए होता त्यांना हे कळले असले तरी पोलिसांना फोन करत कारवाई करा असे म्हटले नाही त्यांनी ते करायला हवे. पंकजा मुंडे यांनी एका मुलीसाठी ठामपणे उभे रहावे, आणि माझा पीए असेल तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पंकजा मुंडेंनी बोलले पाहिजे.
Three Booked in Dr Gauri Palve Garje Suicide Case
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















