विशेष प्रतिनिधी
फलटण: शिवसेनेपुढे कोणतीही दहशत उभी राहत नाही, उलट आमचीच दहशत राज्यात टिकून आहे. मंत्री झाल्यानंतर शिंदे गटाने शांततेत काम करण्याची सूचना दिली असली, तरी याला मर्यादा असते आणि कोणत्याही पक्षाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी पंगा घेतल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. Shambhuraj Desai
फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर शंभूराज देसाई म्हणाले, सध्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही. शिवसेना हा अन्याय सहन करणारा पक्ष नाही. मृत डॉक्टरला दबाव आणणारा कोणत्याही सत्ताधारी गटाचा असो वा कुणाचाही असो, त्याला गाठून दाखवू. आचारसंहिता सुरू असल्यामुळे कारवाई मर्यादित असली, तरी ती संपताच आरोपींवर कठोर पाऊल उचलले जाईल, Shambhuraj Desai
मंत्रीपदाचा मोह न बाळगता आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो आणि गुवाहाटीपर्यंत साथ दिली. मंत्रीपदासाठी लोक पक्ष बदलतात, पण आम्ही मिळालेले पद सोडून शिंदे साहेबांसोबत उभे राहिलो, कारण ते जीवाला जीव देणारे नेतृत्व आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आजही तितकाच दृढ आहे असे देसाई यांनी सांगितले. Shambhuraj Desai
एकनाथ शिंदे 28 नोव्हेंबर रोजी फलटणमध्ये येणार असल्याचे जाहीर करत देसाई म्हणाले, या भेटीदरम्यान येत्या पाच वर्षांत फलटण तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप निश्चित केला जाईल. अनिकेतराजे यांच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या अपेक्षा आणि गरजा मांडाव्यात. तालुक्याच्या बदलासाठी आणि विकासासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना नात्यात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देसाई यांचा इशारा कोणाकडे अशी चर्चा सुरू आहे.
http://youtube.com/post/UgkxwjPNS5N4e1S9wDQpM5N8fvJV85LbzPx4?si=EI_9Y4u14T8SCF58
Shambhuraj Desai Issues Warning, Says ‘No Fear Tactics Work on Shiv Sena’
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















