विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाकिस्तानात गेलेला सिंध आज भारताचा भाग नसला तरी, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तो नेहमीच भारताचा भाग असेल. जमिनीच्या बाबतीतसीमा कधीही बदलू शकतात. काय माहित उद्या सिंध भारतात परत येऊ शकतो, अशी अपेक्षा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. Rajnath Singh
दिल्लीतील विज्ञान भवन येथे वर्ल्ड सिंधी हिंदू फाउंडेशन ऑफ असोसिएशन (VSHFA) द्वारे आयोजित “स्ट्रॉंग सोसायटी – स्ट्रॉंग इंडिया” कार्यक्रमात कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, फाळणीनंतर सिंधू नदीजवळील सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि त्या प्रदेशात राहणारे सिंधी लोक भारतात आले. या सिंध प्रांताचे भारतापासून वेगळे होणे हे लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांच्या पिढीने कधीही स्वीकारले नाही.सिंधू नदीला पवित्र मानणारे सिंधमधील आपले लोक नेहमीच भारताचे राहतील. ते कुठेही असले तरी ते नेहमीच आपले राहतील. Rajnath Singh
लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदू आणि आमच्या पिढीतील लोक अजूनही सिंधचे भारतापासून वेगळे होणे स्वीकारू शकलेले नाहीत. केवळ सिंधमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतातील हिंदू लोक सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधमधील अनेक मुस्लिमांनाही असं वाटत होते की सिंधू नदीचे पाणी मक्केच्या झमझमच्या पाण्यापेक्षा कमी पवित्र नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. Rajnath Singh
राजनाथ सिंह म्हणाले की, ‘फाळणीनंतर, भारतातील सिंधी समुदायाची सुरुवात शून्यातून झाली, मात्र त्यांनी आता नवीन उंची गाठली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सिंधी समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.’
http://youtube.com/post/UgkxwjPNS5N4e1S9wDQpM5N8fvJV85LbzPx4?si=EI_9Y4u14T8SCF58
“Sindh May Rejoin India Soon, Claims Defence Minister Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















