विशेष प्रतिनिधी
मुंबई : डॉ. गौरी पालवे – गर्जे आत्महत्या प्रकरणी फरार झालेल्या तिचा पती अनंत गर्जे याला अटक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी त्याला अटक केली. अनंत गर्जे हा भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक आहे.
शनिवारी (22 नोव्हेंबर) रात्री डॉ. गौरी पालवे-गर्जे हिने आत्महत्या केली, असे अनंत गर्जे याने कळवले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात नेल्यानंतर तो पळून गेला होता. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे हिने आत्महत्या केली आहे. दरम्यान, या आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आणि अनंत गर्जे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे याचा विवाह डॉ. गौरीसोबत झाला होता. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. अनंत गर्जे याचे एक महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून गौरी आणि त्याच्यात वाद होते. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला होता. वरळीतील बीडीडी येथे ते राहात होते. गौरी केईएम रुग्णालय डेंटिस्ट विभागात होती.
अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए आहे, त्यामुळे त्यांनी अनंत गर्जे याची बाजू न घेता पीडितेच्या कुटुंबीयांसोबत उभे राहिले पाहिजे. पीए असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच त्याने रुग्णालयात गौरीला आणल्यानंतर त्याचवेळी पोलिसांनी पकडायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















