विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. यावरून प्रकाश महाजन यांनी दमानिया यांना चांगलेच सुनावले आहे. पंकजाचे नाव ऐकले की दमानिया बिळातून बाहेर येतात, असा टाेला महाजन यांनी लगावला आहे.
डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात असल्याचा आरोप महाजन यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला. ते म्हणाले, दमानिया या केवळ पंकजा मुंडे यांच्या विरोधासाठीच प्रकरणात उडी घेत आहेत. पंकजाचं नाव आलं की दमानिया बिळातून बाहेर येतात. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणापासून बीडमधील इतर घटनांपर्यंत दमानिया दिसल्या नाहीत, पण पंकजांच्या संदर्भातील कोणत्याही मुद्द्यावर त्या अचानक आवाज उठवतात. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी त्या व्हेंटिलेटरवरूनही उठतील .
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील घरात त्यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली असली तरी कुटुंबीयांनी हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गौरीला गेल्या काही महिन्यांपासून अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. विशेषतः अनंत गर्जेचे इतर एका महिलेबरोबर संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर घरातील तणाव वाढल्याची माहितीही समोर आली आहे.
या आरोपांनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरही या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून न्याय मिळावा, यासाठी गौरीच्या कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेतली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या एका तरुणीचा असा अकाली मृत्यू झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका करताच राजकीय वातावरण अधिक तापले. दमानिया म्हणाल्या की, गौरीने आत्महत्या केली असे स्वतःला वाटत नाही. तसेच घटनेच्या रात्रीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला हवे होते. माझा पीए असेल तरी योग्य ती कारवाई करा, असे पंकजा मुंडेंनी सांगितले असते तर प्रशासन अधिक तत्परतेने हालले असते, असे दमानिया यांनी म्हटले.
She crawl out of holes when hear Pankaja’s name, Prakash Mahajan targets Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















