विशेष प्रतिनिधी
पुणे : Tejashwi Yadav माझे उमेदवार निवडून दिले तर भरपूर निधी देणार, अन्यथा निधीवर काट मारणार अशी ‘दादागिरी’ची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात वापरली हाेती. यावरून विराेधकांनी टीकेची झाेड उठवल्यावर पवारांनी स्पष्टीकरण देताना बिहार निवडणुकीतील तेजस्वी यादवांच्या घाेषणांचा दाखला दिला आहे. Tejashwi Yadav
बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले
शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी विचारले असता अजित पवार म्हणाले, बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते Tejashwi Yadav
माळेगाव नगरपंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे, हे सांगताना अजित पवार म्हणाले हाेते की, माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त पाच-सहा कोटी रुपयांचं. त्यात तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला, तीच गोष्ट आपल्याला माळेगावला करायची आहे. माळेगाव नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल, तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल. आम्ही ज्या अठरा लोकांचे पॅनल उभं केलं आहे त्यांना निवडून द्या. मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला विकासाची काम करून देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. त्यामुळे संकुचित विचार ठेवू नका, मन मोठं करा. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काट मारली तर मी पण काट मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते..
Citing Tejashwi Yadav, Ajit Pawar appears to support Fund’s strong-arm tactics
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















