Anjali Damania : पार्थ पवार काही कुकूले बाळ नाहीत, अंजली दमानिया यांनी उडवली अजित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Anjali Damania पार्थ पवार काही कुकूले बाळ नाहीत. या प्रकरणात जी काही कृत्ये झाली आहेत, ती साधी चूक नाही तर सरळसरळ फ्रॉड आहे, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली. Anjali Damania

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा येथील सुमारे 40 एकर जमीन विक्री प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने प्रमुख अधिकारपत्रधारक म्हणजेच कुलमुखत्यारधार म्हणून काम पाहणाऱ्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. Anjali Damania

तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली असली, तरी या व्यवहाराशी थेट संबंधित असलेल्या पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडताना या गैरव्यवहाराचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले आहे. अनौपचारिक चर्चेत पवार यांनीसांगितले की, संबंधित व्यवहार सुरू असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य पद्धतीने तपासणी करणे अपेक्षित होते. कोणतीही त्रुटी किंवा चुकीची बाब आढळून आली असती, तर त्याच वेळी अधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. अधिकाऱ्यांकडून वेळीच कारवाई झाली असती, तर पुढील साखळी घडामोडी घडल्या नसत्या, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. Anjali Damania



अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची तीव्र शब्दांत खिल्ली उडवत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, लहान मुलं शाळेत असताना, म्हणजेच कुकूले बाळ असताना, त्यांच्या भांडणात शिक्षकांनी लक्ष द्यायला हवं होतं, असं आपण म्हणू शकतो. पण अजित पवारांच्या वक्तव्याची तुलना त्यांनी अशाच परिस्थितीशी केली आणि थेट सवाल केला की, पार्थ पवार काही कुकूले बाळ नाहीत. या प्रकरणात जी काही कृत्ये झाली आहेत, ती साधी चूक नाही तर सरळसरळ फ्रॉड आहे. एकदा नव्हे, तर सातत्याने कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आले, सप्लीमेंट एलएलपी तयार करण्यात आली, रिझोल्यूशन पास करण्यात आले, खोटा एलओआय मिळवण्यात आला, त्यानंतर अ‍ॅडज्युडिकेशन करण्यात आले, विक्री व्यवहार करण्यात आला आणि अखेर ताबाही घेण्यात आला. एखादी व्यक्ती इतक्या टप्प्यांतून हा व्यवहार पूर्ण करत असेल, तर ती चूक नसून सुनियोजित फसवणूक आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, जर एखाद्या अधिकाऱ्यांना तुमच्या मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा. या प्रकरणात अधिकाऱ्यांची चूक नाही, कारण जे घडलं आहे ते स्पष्टपणे दिसणारं आणि दस्तऐवजांमधून सिद्ध होणारं आहे. त्यामुळे प्रशासनालाच दोष देणं चुकीचं आहे. आम्हाला जे लढायचं आहे, ते आम्ही लढणारच आहोत. सत्ता, पद किंवा वजनाच्या जोरावर अशा प्रकरणांवर पडदा टाकता येणार नाही.

Parth Pawar is not a chicken baby, Anjali Damania mocks Ajit Pawar’s statement

महत्वाच्या बातम्या