विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या 24 वर्षीय तरुण केतन विशाल अग्रवाल याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र केतन याचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Ketan Agrawal
जयपूर येथे हाेणाऱ्या शाही साेहळ्याची संपूर्ण तयारी झालेली. पॅलेस, दाेन विमानेही बुक केलेली. मात्र, केतन अग्रवालसाेबत लग्न पसंत नसल्याने त्याची हाेणारी बायकाे सिया गाेयल हिने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून देऊन त्याचा खून केल्याचा पाेलीसांना संशय आहे. केतन हा प्रसिध्द उद्याेजक विशाल अग्रवाल याचा मुलगा. सिया ही मार्केटयार्डमधील मसाल्याचे प्रसिध्द व्यापारी गाेयल यांची मुलगी आहे.
दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे हाेणाऱ्या साेहळ्यासाठी दोन विमानेही बुक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने मित्राच्या मदतीने केतनला वाटेतून हटवण्याचा कट रचला. केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला.
लोहगड किल्ल्यावरून पडून केतनचा मृत्यू झाल्याचा बनावही रचण्यात आला हाेता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची कसून चौकशी केली. या तपासात सिया गोयलला केतनसोबत लग्न करायचे नव्हते हे स्पष्ट झाले. हा विवाह मान्य नसल्याने तिने केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला. नियोजित कटानुसार, तिने केतनला फोटो काढण्याच्या बहाण्याने किल्ल्याच्या धोकादायक कड्यावर नेले आणि संधी मिळताच मित्रांच्या मदतीने त्याला दरीत ढकलून दिले.
Ketan Agrawal murder: Fiancée Siya Goyal allegedly pushed
महत्वाच्या बातम्या