विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Dina Patil’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षांतरानंतर केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटील म्हणाले, “मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाशीही समस्या नाही. मला फक्त एका व्यक्तीसोबत समस्या आहेत.” मात्र त्यांनी त्या व्यक्तीचे नाव घेण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.Sanjay Dina Patil’
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेऊन त्यांच्यावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, “ज्या व्यक्तीसोबत माझी अडचण होती, त्यालाच बोलावले असते तर ही वेळ आली नसती. मला बोलावून घेतले असते, माझे म्हणणे ऐकले असते आणि जिथे मला शिव्या दिल्या तिथे माफी मागितली असती, तर मी स्वतः मातोश्रीवर गेलो असतो.”Sanjay Dina Patil’
यावेळी त्यांनी ठाकरे गटातील एका नेत्यावर नाव न घेता गंभीर आरोप करत, “त्यांना ताकदवान लोक नकोत, त्यांना गुलाम हवेत,” असा टोला लगावला. दरम्यान, त्यांच्या मुलगी आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत विचारले असता संजय दिना पाटील म्हणाले, “माझ्या घरात प्रत्येकाला स्वतःचा राजकीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. माझा पुतण्या भाजपमध्ये आहे, सून भाजपची नगरसेवक आहे. तरी आम्ही एकाच घरात राहतो आणि एकत्र जेवतो. त्यामुळे मला कोणतीही अडचण नाही.”
विशेष म्हणजे, चर्चेत असलेल्या व्यक्तीचे नाव घेताना त्यांनी संजय राऊत यांचे नाव नाकारले. “संजय राऊत यांनी मला नेहमीच साथ दिली. मला आमदार आणि नंतर खासदार होण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेतील या मोठ्या राजकीय भूकंपानंतर संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
“Not Uddhav, but one person is the problem”: Sanjay Dina Patil’s veiled swipe
महत्वाच्या बातम्या