PM Modi : वयाच्या ६० व्या वर्षीही ३० वर्षांच्या तरुणांइतकी ऊर्जा हवी, पंतप्रधान मोदी यांचा कोलकात्यात हजारोंसोबत योगाभ्यास; ‘योग ३६५’ संकल्पनेवर भर

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : PM Modi  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोड मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो योगसाधकांसह सामूहिक योगाभ्यास केला. यावेळी योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देताना त्यांनी योगाला केवळ व्यायाम नव्हे, तर मानवी आत्म्याची अभिव्यक्ती असे संबोधले.PM Modi

हजारोंच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही आणि तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही. योग ही मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे. तो आपल्याला संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो. काय करावे आणि काय करू नये याचे भान योगामुळे प्राप्त होते.”
योग आणि वय यांचा संबंध स्पष्ट करताना त्यांनी एक महत्त्वाकांक्षी पण प्रेरणादायी उद्दिष्ट समोर ठेवले. “आपले ध्येय असे असावे की वयाच्या ४० व्या वर्षी आपण २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक असावे आणि वयाच्या ६० व्या वर्षी ३० व्या वर्षापेक्षा अधिक ऊर्जावान असावे. नियमित योगाभ्यासामुळे हे साध्य होऊ शकते,” असे ते म्हणाले.PM Modi



ही सर्व बाब फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.पती विक्रांत हा विवाहितेला वारंवार घरात कोंडून ठेवायचा. तिला नोकरी करण्यास

योगाला केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. “योग हा फक्त विशेष दिवसांसाठी नसून तो जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. प्रत्येक दिवस योगाचा असावा,” असे ते म्हणाले. याच उद्देशाने केंद्र सरकारने यावर्षी ‘योग ३६५’ ही संकल्पना सुरू केली असून, वर्षभर योगाचा प्रसार करण्यासाठी १०० दिवसांचे ऑनलाइन योग प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १९ जून रोजी राज्यभर ‘रन फॉर योगा’ उपक्रम राबविण्यात आला. तर २० जून रोजी पश्चिम बंगाल दिनानिमित्त हुगळी नदीच्या तीरावर ‘वंदे योगम्’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आजच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हजारो नागरिकांसोबत विविध योगासने आणि प्राणायाम केले. कार्यक्रमस्थळी तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जगातील सुमारे २,५०० हून अधिक ठिकाणी योगविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. २१० हून अधिक भारतीय दूतावास, वाणिज्य दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.

गेल्या दशकभरात योगाने जागतिक आरोग्य चळवळीचे स्वरूप धारण केले असून, आज तो आरोग्य, मानसिक शांतता, तणावमुक्त जीवन आणि जागतिक कल्याणाचा प्रभावी मार्ग म्हणून स्वीकारला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा योगाची जागतिक लोकप्रियता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाची ताकद अधोरेखित झाली.

At 60, want the energy of a 30-year-old? PM Modi practices yoga with thousands in Kolkata, stresses ‘Yoga 365’

महत्वाच्या बातम्या