विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत आपल्या खास शैलीत विरोधकांना इशारा दिला. “काल-परवापासून काही कुत्रे भुंकत आहेत. कुत्रे झुंडीत येतात, पण वाघ एकटाच येतो. कुत्रे भुंकत राहतात, वाघ शिकार करतो. हे तर फक्त ट्रेलर आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.Eknath Shinde
शिंदे म्हणाले की, पंतप्रधान यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लावण्याची हिंमत कुणी केलेली नाही. राम मंदिराची उभारणी आणि कलम ३७० हटविण्याचा निर्णय ही हिंदुत्ववादी विचारसरणीची मोठी यशे असून ती बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने होती, असे त्यांनी सांगितले.Eknath Shinde
ठाकरे गटावर टीका करताना शिंदे म्हणाले की, सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड करण्यात आली. शिवसेना फोडणाऱ्यांचे गुणगान केले जाते, मात्र धनुष्यबाण चिन्ह वाचविणाऱ्यांवर टीका केली जाते. “४० आमदार माझ्यासोबत आले होते, पण या एकनाथ शिंदेंनी ६० आमदार निवडून आणले,” असा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि माझ्यात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. मात्र आम्ही एक टीम म्हणून काम करतो. आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आता गावागावांत पोहोचली असून जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा दावा करत शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार तोच जो त्यांच्या विचारांवर आणि कार्यपद्धतीवर चालतो. “शिवसेना म्हणजे कुणाच्या मालकीची ७/१२ उताऱ्यावरील जमीन नाही. केवळ रक्ताचे नाते असणे म्हणजे वारसदार होणे नाही. प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे,” असे ते म्हणाले.
Dogs bark, a tiger hunts’: Eknath Shinde warns Thackeray camp
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप