विशेष प्रतिनिधी
मुंबई : उध्दव ठाकरे अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जगत आहेत. कार्यकर्ते मूर्ख नाहीत. त्यांना हा दुहेरी खेळ दिसत आहे, असा टाेला वंचित बहुजन बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आआंबेडकर यांंनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. Prakash Ambedkar
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकर म्हणाले “हे कोणतेही ऑपरेशन टायगर नाही, तर स्वतःचे खासदार सांभाळण्यात आलेले अपयश आहे. याला ऑपरेशन टायगर म्हणता येणार नाही. त्यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत. त्यांचेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना भेटतात, पुन्हा परत येण्याबाबत चर्चा करतात आणि कार्यकर्त्यांनी मात्र निष्ठावान राहावे अशी अपेक्षा ठेवतात.तुम्ही स्वतः पक्षाशी प्रामाणिक नसाल, तर कार्यकर्ते कुठून निष्ठावान राहतील? स्पष्टपणे सांगा की तुम्हाला भाजपसोबत जायचे आहे. मग कार्यकर्त्यांमध्ये तरी संभ्रम राहणार नाही
ठाकरे गटाच्या राजकीय धोरणावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, “एकीकडे भाजपकडे लाइन मारायची आणि दुसरीकडे काँग्रेससोबत लग्न करायचे. हा दुटप्पीपणा कार्यकर्त्यांना दिसत आहे. त्यामुळे खासदार निघून गेले यात काही नवीन नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणातही नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वर्षानुवर्षे वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आज खऱ्या अर्थाने कोण कोणाची ‘बी टीम’ आहे हे जनतेसमोर आले आहे.
आरएसएस आणि भाजप देश तोडण्याचे काम करत आहेत. सीमांकन (Delimitation) विधेयकाचा सर्वात मोठा फटका दक्षिण भारताला बसणार आहे, तर त्याचा राजकीय फायदा उत्तर भारताला होणार आहे. भाजपचा राष्ट्रवाद हा केवळ दिखावा आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केले.
Prakash Ambedkar jibes at Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप