संजय राऊत उबाठाला लागलेली कीड, नीलेश राणे यांचा हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही भाषा वापरत असतील तर उद्धव ठाकरेंचे नुकसान करत आहेत की फायदा हे त्यांनी ठरवले पाहिजे, शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी म्हटले आहे. Sanjay Raut

नीलेश राणे म्हणाले की, शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. संजय राऊत यांच्याकडून चांगले बोलण्याची काय अपेक्षा ठेवणार आहोत. ज्यांनी काही स्वत: कमावलेले असते त्यांना वाटते की आपण लोकांना जवळ करावे, लोकांना परत बोलवावे. यांनी स्वत: काहीही कमावलेले नाही त्यामुळे यांना वाटते की सर्वांनी जावे आणि माझ्याच हातात सर्व काही असावे. शिवसेना यांनी कुठेच उभी केली नाही, त्यांनी कोणत्याही ठिकाणी संघटनात्मक बांधणी केली नाही किंवा निवडणूक सुद्धा लढवली नाही.



संजय राऊत यांना राज्यसभा मिळते तिथे ते आरामात बसतात. शिवसेना म्हणजे संघर्षांचे दुसरे नाव आहे. जेव्हा संघटना वाढत होती त्यावेळी संजय राऊत कुठे होते. शिवसेना राहिली काय अन् संपली काय, उद्धव ठाकरे राहिले काय नाही राहिले तरी संजय राऊत राहिले पाहिजे आणि त्याचसाठी राऊत काम करतात त्यातूनच ते अशी भाषा वापरतात, ही काय भाषा आहे का?

ते जनतेमधून निवडून तर येत नाही. राज्यसभेची त्यांची दुसरी किंवा तिसरी टर्म असेल त्यांना लोकांना शिव्या देत काय साध्य करायचे आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मदत होईल की नुकसान होईल याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Sanjay Raut is the rot within UBT, says Nilesh Rane

 

महत्वाच्या बातम्या