विशेष प्रतिनिधी
मुंबई : फुटलेल्या खासदारांना तुडवा अशी थेट धमकी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप मधील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे. Sanjay Raut
ईशान्य मुंबई चे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलीस सतर्क झाले आहेत. या ठिकाणी कार्यकर्ते ही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भांडुप हा शिवसेना ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता आहे
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “बंडखोरांना तुडवा” या विधानानंतर या खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नाव आलेल्या सर्व सहा खासदारांना वाय प्लस सुरक्षा मंजूर करण्यात आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने हा निर्णय घेतला आहे. वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचे राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता या खासदारांच्या निवासस्थानी आणि सोबत 24 तास पोलीस कर्मचारी राहणार आहेत.
तुम्ही पाहिलं तर या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. एकनाथ शिंदे आणि या खासदारांना यावेळची बेईमानी महागात पडणार आहे. आता आम्ही शांत बसणार नाही. भाजपाने ज्याप्रकारे देशाच्या आणि खासकरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घाण केली आहे, त्यामुळे त्यांनाही किंमत मोजावी लागेल,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
Tight security deployed outside Sanjay Dina Patil’s residence after Sanjay Raut’s warning
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला