शिंदे साहेबांचं प्लॅनिंग एकदम करेक्ट, ठाकरेंचे आमदारही फुटणार असल्याचा बच्चू कडू यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असतं. बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणारच असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी हाेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर, आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, राज्यात सर्वसामान्य, शेतकरी, गरीब आणि दिव्यांगांचा खरा माणूस म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. मी जसा त्यांच्या सेवाभावी वृत्तीच्या मोहात पडलो, तसेच अनेक नेते आज त्यांच्या मोहात आहेत.”



दरम्यान, कडू यांच्याबराेबरच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संताेष बांगर म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या…उबाठा गटातील 13 ते 14 आमदार आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिंदे साहेब हिंदुत्वाच्या विचारांवर महाराष्ट्राला पुढे नेत आहेत.

Shinde Saheb’s planning is absolutely correct, Bachchu Kadu claims that Thackeray’s MLAs will also split

 

महत्वाच्या बातम्या