विशेष प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा कायम आहेत. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नसताना तुळजापुरात झळकलेल्या एका बॅनर वरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनर वर ओमराजे यांचा शिवसेनेत स्वागत करण्यात आलं आहे. विशेषतः “वाघ चालला वाघाच्या कळपात” हे वाक्य या बॅनरवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Omraj
आश्चर्याची बाब म्हणजे, हे बॅनर्स ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर विरोधक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. तुळजापूरचे तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी पुढाकार घेऊन हे बॅनर्स लावलेत. कट्टर विरोधकांच्याच बालेकिल्ल्यात लागलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
तसेच पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले होते की, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्ट्या विचार केला तर पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, मात्र राजकीयदृष्ट्या विचार केला तर हा निर्णय अगदी बरोबर आहे. माझ्यावर शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. परंतु, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या कोर्टाच्या निकालानंतर, सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी माझा अंतिम निर्णय 20 जूननंतर जाहीर करणार आहे,” असे त्यांनी मत स्पष्ट केले होते.
एकीकडे मैदानावर ही बॅनरबाजी सुरू असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी ओमराजेंना धारेवर धरले आहे . ओमराजे निंबाळकर यांच्या या संभाव्य निर्णयावर सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या विरोधात टीकात्मक कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. अनेक जुने कार्यकर्ते आणि मतदार यामुळे नाराज झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.
Banners for Omraje displayed in Tuljapur.
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप