विशेष प्रतिनिधी
मुंबई : “जैन धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, पण काही जैन मुनी हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण करत आहेत. कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरणाऱ्या एकाला तर मुनीही म्हणत नाहीत. कसले पांढरे पट्टे सोसायट्यांमध्ये मारता? कधी कबुतरांचा विषय तर कधी पट्ट्यांचा विषय. आम्हाला वाद नको आहेत, पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी?” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
य मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात सत्ताधारी पक्ष, मतदार याद्यांतील कथित घोळ, वीज क्षेत्रातील घडामोडी आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा लावण्याच्या वादावरून संताप व्यक्त करताना त्यांनी काही जैन मुनींवर भाजपचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आणि मराठी समाजाला लक्ष्य करणारे वाद निर्माण केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.
राज्यात शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न असताना जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून हटवण्यासाठी नवनवे वाद उकरून काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार आणि खासदारांची फोडाफोड, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांच्या चर्चांमुळे लोकशाहीची हानी होत असल्याचेही ते म्हणाले.
महावितरणच्या संभाव्य आयपीओवर भाष्य करताना ठाकरे यांनी राज्याच्या वीज वितरण व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. वीज क्षेत्रातील खासगीकरणामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेवर मोजक्या उद्योगसमूहांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. जनतेला आंदोलनांमध्ये गुंतवून ठेवत असताना सिस्टीम ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) काही खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत बोलताना, ही २०२९ च्या निवडणुकांसाठीची राजकीय रणनीती आहे. भाजपमध्येही अंतर्गत अस्वस्थता असून आगामी काळात राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
लाडकी बहीणसह विविध आर्थिक योजनांवर टीका करताना, महिलांना थेट आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांच्या सक्षमीकरणासाठी दीर्घकालीन धोरणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा योजनांमुळे राज्याच्या आर्थिक संसाधनांवर ताण येत असल्याचाही त्यांनी दावा केला.
मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांवरही ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. काही मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा दावा करत त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. आंदोलनांइतकेच मतदार यादीतील प्रत्येक नाव महत्त्वाचे असून सत्तेचा मार्ग मतदार यादीतूनच जातो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
Have you ever seen the strength of a Marathi man’s wrist? Raj Thackeray warns Jain monks
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप