Manikrao Kokate : अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manikrao Kokate क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारला आहे. स्वतः अजित पवार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. “माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू.” असे अजित पवार म्हणाले आहेत.Manikrao Kokate

राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला होता.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. “संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. “

संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. “सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता तसेच न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावे, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नाशिक पोलीसांचे एक पथक मुंबईकडे रवाना झाले असून ज्यामध्ये 3 पोलीस अधिकारी आणि 10 अंमलदारांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारी (17 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिल्यानंतर कोकाटे यांचे खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार ही कारवाई केली जात आहे.

Ajit Pawar accepts Manikrao Kokate’s resignation

महत्वाच्या बातम्या