मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चौकशी होण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि बारामती पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रोहित पवारांची एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर रोहित पवार यांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. मात्र आता रोहित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याची पाहायला मिळत आहे Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले की, अमित ठाकरे यांना विनंती केली होती की, मला राज ठाकरेंना भेटायचं आहे. त्यांची मला वेळ मिळू शकते का? लगेचच राज ठाकरे यांनी मला वेळ दिली. कारण त्यांनी मला विचारलं होतं काय विषय आहे. मी त्यांना सांगितलं की, अजित पवार यांच्याबाबतीत जो काही घातपात झाला आहे, त्याची मला आपल्याला माहिती द्यायची आहे. अजितदादांचा विषय असल्यामुळे मला लगेच वेळ मिळाला. त्यानंतर आज इथे आल्यानंतर बराच वेळ राज ठाकरे यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काही माहिती मी घेऊन गेलो होत, ती सर्व माहिती त्यांनी समजून घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितलं की, एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला? राज ठाकरेंचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला सर्वोच्च न्यायालयाचे दोन दाखले दिले. ज्यामध्ये अपघाती मृत्य झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा अधिकार आहे. तसेच काहीही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, हा त्यांनी मला दुसरा दाखला दिला, असे त्यांनी सांगितलं.Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी मला एकच प्रश्न केला, या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नागरिकांचा एफआयआर होत नसेल, तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्याबाबतीत राज ठाकरे काय भूमिका घेतील हे आपल्याला येत्या काळात कळेलच. पण त्यांनी मला सांगितलं की, अजितदादांनी मी ओळखत होतो. आम्ही जवळून काम केलेलं आहे. जेव्हा कधी भेटायचो तेव्हा आम्ही बोलायचो. त्यामुळे आता अजितदादा असले काय किंवा कोणीही असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावं लागेल, ते आम्ही आमच्या लेव्हलला त्याठिकाणी करू, असे त्यांनी मला सांगितलं आहे. तसेच आता विधीमंडळामध्ये आमच्या बैठका आहेत. काही लोकांनी मला वेळ दिलेली आहे. त्यामुळे तिथे मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.Rohit Pawar
Rohit Pawar Turns Aggressive Over FIR Delay; Meets Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Sunetra Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
- Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा
- व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांचा नकार, दबाव असल्याचा राेहित पवार यांचा आराेप
- बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण