Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange मुंबईत आपल्या विरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जात आहे. त्यामध्ये एका महिलेचाही सहभाग आहे. मी गरिबांसाठी काम करतो, म्हणून माझ्याविरोधात योजना आखली जात आहे. मंत्रालयातच काही हालचाली सुरू आहेत, असा दावा मराठा आंदोलक मनाेज जरांगे (Manoj Jarange)  यांनी केला आहे.



जरांगे (Manoj Jarange)  म्हणाले की, येत्या चार ते पाच दिवसांत मुंबईत मोठी खेळी होणार आहे. त्या कटात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मला मिळाली आहे. स्टिंग ऑपरेशनची तयारी सुरू आहे. मात्र आम्हीही काही कमी नाही. आमची यंत्रणा देखील सतर्क आहे. मी कोणासाठी काम करतो? तर फक्त गरिबांच्या लेकरांसाठी. त्यामुळे मला घाबरवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कट का रचला जातोय, हे सर्वांना माहीत आहे. मी सामाजिक प्रश्नांवर उभा राहतो, शेतकरी आणि वंचितांसाठी आवाज उठवतो. त्यामुळे काहींना ते खटकत असावे.

दरम्यान, परभणीत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचीही जरांगे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपलं म्हणणं ठामपणे सरकारदरबारी मांडलं पाहिजे, असे ते म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली असून शेतकऱ्यांची मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जर शेतकऱ्यांना जमीन द्यायची नसेल, तर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही विकासकामासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो. जमिनीचा प्रश्न हा भावनिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा आहे. सरकारने संवाद साधून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. परभणीतील शेतकरी मागील काही दिवसांपासून आंदोलन करत असून त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जरांगे यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जरांगे म्हणाले, पवार कुटुंबीयांना जर सखोल चौकशी हवी असेल, तर ती झालीच पाहिजे. सध्या जी माहिती समोर येत आहे, त्यावरून अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. कोणताही निष्कर्ष गाठण्यापूर्वी तपास पूर्ण होणे गरजेचे आहे.

Sting operation plot against me, woman also involved: Manoj Jarange claims

महत्वाच्या बातम्या