विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकतेच तिसरे लग्न केलेल्या बॉलिवूड अभिनेता आमिर खानला लक्ष्य करणारी एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या माध्यमातून आमिर खानला धमकी दिली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या ‘अर्जू बिश्नोई’ आणि ‘टायसन बिश्नोई’ या व्यक्तींनी दिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, आथा आमिर खानला सोशल मीडियावर मिळालेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले की, पोलीस त्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉइस क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. Aamir Khan
आमिर खानला सोशल मीडियाद्वारे देण्यात आलेल्या धमकीत लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले आहे की, आमिर खान देशात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहे आणि ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. तसेच अशा प्रकारच्या कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध लॉरेन्स बिश्नोई गँग स्वतः कारवाई करेल, असा दावा यात केला आहे. तसेच, स्टारडमच्या आडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्यांनाही यात इशारा देण्यात आला आहे.
या पोस्टमध्ये राजस्थानमधील श्री गंगानगर येथील गेल्या महिन्यातील एका घटनेचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये 13 वर्षांच्या मुलीचे कथित अपहरण, तस्करी आणि लैंगिक अत्याचार यांचा समावेश होता. प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक करतानाच काही राजकीय नेत्यांवर आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यात केला आहे आणि त्यांनाही इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, पोस्टमध्ये टोळीचे दोन सदस्य ‘परवेश’ आणि ‘हिमांशू’ यांचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याचा संकल्प केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कथित फेसबुक पोस्ट आणि व्हॉइस नोटद्वारे पोलिसांना या धमकीची माहिती मिळाली. मुंबई पोलीस सध्या या पोस्ट आणि व्हॉइस क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, आमीर खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले की, “आम्ही सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉइस क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहोत.” तपासातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
Lawrence Bishnoi Gang Threatens Aamir Khan, Mumbai Police Launch Probe
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा