Wari 2026 : आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘फिनोलेक्स’चा पुढाकार; लाखो साहित्याचे वाटप; वारकऱ्यांकडूनही उपक्रमाचे कौतुक

विशेष प्रतिनिधी

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये प्रसिद्ध उद्योग समूह ‘फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज’ कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. वारी मार्गावर वारकऱ्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर विविध आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. ( Ashadhi Wari 2026 )



आतापर्यंत या वारीच्या वाटेवर वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून फिनोलेक्स कंपनीने तब्बल 4.6 लाख (4 लाख 60 हजार) पिशव्यांचे (Bags) वाटप केले आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांचे वारकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. या पिशव्यांमुळे आमचे सामान पावसात भिजत नाही, अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली आहे. यासोबतच 35,000 पोंचो (poncho) वारकऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय ज्येष्ठ वारकऱ्यांना चालताना आधार मिळावा यासाठी 20,000 हून अधिक काठ्यांचे (Walking Sticks) वाटप करण्यात आले असून, यामुळे ज्येष्ठ वारकऱ्यांची वारी अधिक सोयीची झाली आहे. ( Finolex Pipes And Fittings )

  • पोलीस दलालाही मदतीचा हात

विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास तैनात असणाऱ्या पोलीस प्रशासनाची दखल घेत फिनोलेक्सने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. वारीच्या बंदोबस्तात पावसातही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी कंपनीने आतापर्यंत 9,750 दर्जेदार रेनकोटचे वाटप केले आहे. तसेच, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी ‘चरणसेवा’ हा विशेष उपक्रमही राबवला जात आहे. तसेच वारीच्या वाटेवर फिनोलेक्सकडून वैद्यकीय कॅम्पही आयोजित करण्यात येत आहे.

  • आता पंढरपुरात पुढील उपक्रम !

फिनोलेक्स समूहाच्या वतीने असे सांगण्यात आले की, वारी मार्गावरील हे उपक्रम यशस्वीपणे राबवल्यानंतर, आता मुख्य सोहळ्यासाठी पंढरपूर शहरात विशेष तयारी करण्यात येत आहे. पंढरपुरात पोहोचणाऱ्या लाखो भाविकांसाठी पुढील काही दिवसांत आणखी विविध सेवाभावी उपक्रम आणि साहित्याचे वाटप केले जाणार आहे. फिनोलेक्सच्या या सर्वसमावेशक आणि निस्वार्थी सेवेबद्दल वारकरी संप्रदायाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कंपनीचे विशेष आभार मानले जात आहेत. दरम्यान, जवळपास गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून ‘फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज’ कंपनीने आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विविध सेवा आणि साहित्य वाटपाचा हा उपक्रम सातत्याने हाती घेतलेला आहे. वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी फिनोलेक्सने घेतलेला हा पुढाकार म्हणजे भक्ती आणि सेवेचा एक सुंदर संगमच म्हणावा लागेल.

Wari 2026: Finolex takes the initiative to serve Warkaris during Ashadhi Wari; distributes supplies in large quantities; Warkaris appreciate the initiative.

महत्वाच्या बातम्या