विशेष प्रतिनिधी
मुंबई: प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला बसले आहेत. त्यांची तुलना ही बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’मधील ‘रँचो’ अर्थात फुंसुक वांगडू या पात्राशी केली जात आहे. मात्र आता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता आमिर खानने रँचो अन् सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही असे स्पष्ट केले आहे. ( Sonam Wangchuk Hunger Strike )
गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि त्यांच्या ढासळलेल्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या शास्त्रज्ञाने आपले उपोषण मागे घ्यावे अशी अपेक्षा सर्वच जण व्यक्त करत आहेत. दरम्यान, ‘3 इडियट्स’ मधील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते ओमी वैद्य यांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी सोनम वांगचुक यांची तुलना ‘रँचो’ या पात्राशी केली आहे. ते म्हणाले की, त्यांना ‘रँचो’ म्हणजेच सोनम वांगचुक यांना मृत्यूच्या दारात पाहायचे नाही. ( Aamir Khan Reaction On Sonam Wangchuk Hunger Strike )
तेव्हापासूनच ‘3 इडियट्स’ चित्रपटात आमिर खानने साकारलेले ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. आता सुपरस्टार आमिर खाननेही या विषयावर भाष्य केले आहे. अलिकडेच त्याने ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’ला भेट दिली, तेव्हा त्याने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल आपली चिंता व्यक्त केली.
Pune: हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोला आठवडाभरात परवानगी; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन!
यावेळी त्याला ‘3 इडियट्स’ची कथा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे का? असे विचारण्यात आले. यावर आमिर खान म्हणाला, ”हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच ओमी वैद्य यांचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यात त्यांनी असा उल्लेख केला आहे… पण त्यात तथ्य नाही. मला हे स्पष्ट करायचे आहे की, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती”.
तसेच पुढे बोलताना आमिर खान म्हणाला, ”तरीही, सोनम वांगचुक जे काम करत आहेत, ते उत्कृष्ट आणि खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केले आहे की, चित्रपटातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हते”.
Sonam Wangchuk: Is the character ‘Rancho’ based on Sonam Wangchuk? Aamir Khan speaks his mind.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा