विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वेळी विराेधकांनी हट्टाने नामंजूर केलेले महिला आरक्षण आणि लोकसभा जागा वाढवण्याबाबतचे ‘परिसीमन विधेयक’ मंजूर करून घेण्याची जाेरदार तयारी केंद्र सरकारने केली आहे. ३६० चा जादुई आकडे गाठण्यापर्यंत सरकारने मजल मारली आहे.
संसदेचे आगामी मान्सून सत्र २० जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. मोदी सरकार या सत्रात बहुप्रतीक्षित महिला आरक्षण आणि लोकसभा जागा वाढवण्याबाबतचे ‘परिसीमन विधेयक’ पुन्हा एकदा मांडण्याच्या तयारीत आहे. हे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत दोन-तृतीयांश बहुमताची म्हणजेच ३६० खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.” गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या विशेष सत्रात आवश्यक संख्याबळ नसल्याने मोदी सरकारला मोठी नामुष्की स्वीकारावी लागली होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यांत बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा उठवत मोदी सरकारने ‘मिशन-३६०’ यशस्वी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मान्सून सत्राची रणनीती ठरवण्यासाठी गेल्या एका आठवड्यापासून भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर बैठका सुरू आहेत. नुकतीच एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष उपस्थित होते. एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील युती तुटली असून, डीएमकेने संसदेत काँग्रेसपासून वेगळे बसण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिलमध्ये परिसीमन बिलाचा कडक विरोध करणाऱ्या डीएमकेचे २२ खासदार आता काही अटींवर सरकारला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे तृणमूल काँग्रेसमधून वेगळे झालेल्या एनसीपीआयचे २० खासदार, वायएसआर काँग्रेसचे ४ खासदार आणि १ अपक्ष खासदार मिळून एनडीएचे पारडे जड झाले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात, असे बोलले जात आहे. वरील गणितानुसार एनडीएचा आकडा ३५४ पर्यंत पोहोचतो. म्हणजेच दोन-तृतीयांश बहुमतासाठी सरकारला अजून केवळ ६ खासदारांची गरज आहे. हे ६ खासदार मिळवण्यासाठी अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर खासदारांशी चर्चा केली आहे
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सूचक संकेत दिले आहेत की, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही पाठिंब्याचा विचार करू. ठाकरे गटाकडे ३ खासदार आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलच्या ८ खासदारांपैकी काहींना गळाला लावल्यास भाजप ३६० चा टप्पा सहज पार करू शकते. शिवाय सपाने देखील अटींवर पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार, सत्ताधारी मूळ एनडीए (NDA) आघाडीकडे २९३ खासदारांचे बळ आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसमधून वेगळे झालेल्या एनसीपीआई (NCPI) पक्षाच्या २० खासदारांची भर पडल्यास हा आकडा ३१३ वर पोहोचतो. त्यानंतर काँग्रेसपासून वेगळी चूल मांडणाऱ्या द्रमुक (DMK) पक्षाच्या २२ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास ही संख्या ३३५ होते. याशिवाय, सरकारला वेळोवेळी साथ देणारे वायएसआरसीपी (YSRCP) आणि १ अपक्ष असे एकूण ५ खासदार जोडले गेल्यास एनडीए ३४० चा टप्पा गाठते.”महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले ६ खासदार जोडल्यास ही ताकद ३४६ होते. तसेच, शरद पवार गटाच्या ८ खासदारांनीही पाठिंबा दिल्यास एनडीएचा एकूण आकडा ३५४ वर पोहोचतो.
Centre Gears Up to Pass Women’s Reservation and Delimitation Bills
महत्वाच्या बातम्या