विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra FDA ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ऑनलाइन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या नव्या उपक्रमामुळे अन्न भेसळ, बनावट औषधे तसेच निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधातील तक्रारी नागरिकांना अधिक सुलभपणे नोंदवता येणार आहेत.Maharashtra FDA
complaints.mahafda.in या पोर्टलवर नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तक्रार दाखल करू शकतात. नागरिकाने आपल्या पसंतीच्या भाषेत तक्रार नोंदवल्यानंतर एआय प्रणाली त्या तक्रारीचे स्पष्ट, सविस्तर आणि अधिकृत स्वरूपात रूपांतर करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवते.Maharashtra FDA
या पोर्टलवर अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी नोंदवता येणार आहेत. यामुळे वेगवेगळ्या प्रणालींची गरज राहणार नाही. AI तक्रारीचे वर्गीकरण करून ती अधिक प्रभावी स्वरूपात तयार करते आणि एका क्लिकमध्ये सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांचा सहभाग वाढेल, तक्रारींचे जलद निवारण होईल, पारदर्शकता वाढेल आणि अन्न तसेच औषध क्षेत्रातील नियमभंगावर अधिक प्रभावी डिजिटल देखरेख ठेवता येईल.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना अन्नपदार्थ किंवा औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास ती दुर्लक्षित न करता तातडीने पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra FDA launches AI complaint portal against food adulteration and fake drugs
महत्वाच्या बातम्या