विशेष प्रतिनिधी
पुणे :- विवाहितेचा छळ करत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याची धक्कादायत घटना समोर आली आहे.या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मला हे बाळ नको आहे, गर्भपात करून घे,” म्हणत पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा विवाह काही काळापूर्वी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या लोकांकडून किरकोळ कारणांवरून वाद घालण्यास सुरुवात झाली. शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि इतर कारणावरून माहेरून पैसे आणण्याचा तगादा सुरु झाला.
यादरम्यान विवाहिता गरोदर राहिली. मात्र, तिला मूल होऊ न देण्याच्या उद्देशाने आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यासाठी पती आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिच्यावर दबाव टाकला आहे.विवाहितेने या गोष्टीला विरोध केला असता, तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि “तुला हे बाळ जन्माला घालू देणार नाही,” अशी धमकीही देण्यात आली. सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तसेच मे २०२६ मध्ये मुलगी झाल्यानंतर ही पतीने “माझा तुझ्याशी आणि मुलीशी काहीही संबंध नाही ” असे सांगितले. आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा दावा करून धमकी दिल्याचे पीडितेने आरोप केले आहेत .
फुरसुंगी पोलिसांत गुन्हा दाखल
पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी तिचे पती, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांसह एकूण चार जणांविरुद्ध हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत. महिलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरोधात पोलिसांनी कडक पावले
Married woman harassed by husband to undergo abortion; incident in Fursungi.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी