विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tukaram Mundhe राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध संकलनापासून ते थेट ग्राहकांच्या ताटात जाईपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी अत्यंत कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहेTukaram Mundhe
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, दुधातील भेसळ आणि कृत्रिम दुधाचा सुळसुळाट रोखण्यासाठी संपूर्ण ‘इकोसिस्टम’ बदलणे गरजेचे आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेले नवे आदेश हे ‘दूध संकलन केंद्रे आणि दूध शीतकरण केंद्रे, दूध प्रक्रिया आणि पॅकेजिंग करणारे उद्योग, किरकोळ विक्रेते आणि बल्क (घाऊक) दूध विक्रेते, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आईस्क्रीमचे उत्पादन व विक्री करणारे व्यावसायिक’ यांना बंधनकारक असतील.
हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर केलेल्या कारवाईचा दाखला देत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व्यवसायिकांना कडक इशारा दिला आहे. हॉटेल तपासणीदरम्यान अनेकांनी ‘पेस्ट कंट्रोल’ केल्याची केवळ खोटी प्रमाणपत्रे दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात तिथे कोणतेही काम झाले नव्हते. अशा लबाडी करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने एफडीएने तात्काळ रद्द केले आहेत.
मला केवळ कागदावरचे नियम आणि प्रमाणपत्रे नको आहेत. जर दुग्ध व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नियमांचे पालन झाले नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट व्यावसायिक लायसन्स (परवाना) रद्द केले जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण वाढ करणे, प्रामाणिक दुध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात आधुनिक अन्न सुरक्षा संस्कृती विकसित करणे हा आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या, निरीक्षण, नमुना विश्लेषणे अंमलबजावणी कारवाईतून दूध पुरवठा साखळीच्या विविध टप्यावर काही गंभीर त्रुटी सातत्याने निदर्शनास आल्या. या त्रुटी केवळ जिल्ह्यापूत्या नाही संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये एकसमान अनुपालन व्यवस्था आवश्यक आहे, असेही मुंढेंनी म्हटले.
दरम्यान, पत्रकारांच्या स्टिंगबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले, बाजारात जे काही सोल कॉल्ड एनर्जी डिंक्स म्हणून येतात, या सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्सच्या कंपन्यांना एनर्जी ड्रिंक्स हा शब्द लिहता येत नाही, 30 जून रोजी याबाबत त्यांना नोटीस काढण्यात आल्या आहेत. 10-12 कंपन्या आहेत, पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या कंपन्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना फिसच्या नियमावलीनुसार संबंधित कंपन्यांना तो शब्द लिहता येत नाही. त्यामुळे, संबंधित कंपन्यांना एनर्जी ड्रिंक असे आपल्या उत्पादनावर लिहता येणार नाही, हे नोटीसमध्ये बजावले आहे. त्यामुळे, आता ते बंद होईल, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
शाळा परिसरात, 500 मीटर परिसरात कुठल्या पदार्थांना, शीतपेयांना विक्री आहे, याचे नियम आहेत. आता, या नियमांची अंलबजावणी करण्याची जबाबदारी एफडीए आयुक्त म्हणून माझी आहे. तसेच, दुसरीकडे शाळेतील मुख्याध्यापकांचीही आहे, आपल्या शाळा परिसरात 500 मीटरच्या आत जर अशा प्रकारचे ड्रिंक्स विकले जात असेल तर आमच्या विभागाला कळवावे, लवकरच याबाबत मी सविस्तर आदेश पारीत करत आहे, असेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाला तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी
राज्यभरात केलेल्या तपासणीत अन्न साखळीमध्ये प्रशासनाला खालील धक्कादायक प्रकार आढळून आले आहेतः
दुधामध्ये पाण्याची भेसळ करणे.
रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करणे आणि विकणे.
दुधात युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि मेलामाईन यांसारख्या मानवी आरोग्यास घातक रसायनांचा वापर.
मिल्क फॅट आणि एसएनएफ मानकांचे सर्रास उल्लंघन.
दूध साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान शीतसाखळीचे पालन न करणे.
विनापरवाना किंवा प्रशासनाकडे नोंदणी न करता व्यवसाय चालवणे.
उत्पादनांवर चुकीचे लेबलिंग करून ग्राहकांची दिशाभूल करणे.
Tukaram Mundhe Cracks Down on Dairy Barons, Warns of Licence Cancellation for Violations
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी