विशेष प्रतिनिधी
पुणे :- लोणी काळभोर येथील इंदिरा नगरमध्ये घरासमोर खोदलेल्या आणि पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी संबंधित ठेकेदारांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर परिसरात नागरिकांनकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.Contractor
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरात सुमारे आठ दिवसांपूर्वी सांडपाण्यासाठी मोठी चर खोदण्यात आली होती. मात्र खोदकाम पूर्ण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था, संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी तीन फूट खोल आणि सुमारे पाच फूट रुंद असा खड्डा जीवघेणा ठरला.
सोहम घरासमोर असताना ३० जून रोजी अचानक बेपत्ता झाला. त्याची आई शिल्पा कसबे यांनी शोध घेतला असता खड्ड्याजवळ त्याची चप्पल त्यांना दिसून आली. त्यानंतर नातेवाईकांनी पाण्यात शोध घेतला असता सोहम त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ठेकेदारांनवर गुन्हा दाखल
संबंधित ठेकेदारांनी कोणतीही उपाययोजना न करता खोदलेला खड्यात तसेच त्यात साचलेलं पाणी यामुळे आपल्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर ठेकेदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.लोणी काळभोर पोलिस फिर्याद नोंद करून घेऊन पुढील तपास करत आहेत.
Contractor solely responsible for the death of an innocent soul in Pune!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी