राम मंदिर चाेरीच्या निषेधासाठी उध्दव ठाकरे करणार आंदोलन, दादरच्या हनुमान मंदिरासमाेर निषेध सभा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “अब हिंदू माफ नाही करेगा.” जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात आम्ही करत आहोत. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी चारच्या सुमारास दादरच्या हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदूंना, ज्यांना ज्यांना असे वाटत आहे की की हिंदू धोक्यात आहे म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करत आहे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. Uddhav Thackeray

राम मंदिरात मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, आज संपूर्ण देशात जो काही गोंधळ सुरू आहे, जी काही अनास्था निर्माण झाली आहे याचे जे मूळ आहे त्यावर आघात करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देश भाजपच्या अमलाखाली आहे. भाजपच्या सत्तेचे जे मूळ आहे, ज्यात आम्ही देखील सहभागी होतो ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झाले होते, त्यात अनेक शिवसैनिक होते. देशातील तमाम हिंदू सहभागी होता. तो काल आजही आपल्याला आठवत असेल. ती सारी दृश्य जनतेच्या मनावर खोलवर रुजलेली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कारसेवकांवर झालेले अत्याचार, त्यानंतर झालेले गोधरा हत्याकांड, अहमदाबाद मधली दंगल, मुंबईत सुद्धा जे काही घडले होते, त्यात हिंदूंनी बरेच काही सोसले होते. त्या सगळ्याचे भांडवल करून भाजप जो हे आंदोलन सुरू होण्याआधी संपूर्ण देशात त्यांचे फक्त दोनच खासदार होते. गांधीवादी समाजवाद हा त्यांनी अंगीकारलेला एक कार्यक्रम होता, ते सोडून ते राम मंदिर हिंदुत्वाकडे वळले. राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहेत.



राम मंदिर हा मुद्दा आता एक वेगळ्या गोष्टीसाठी चर्चिला जात आहे, हे दुर्दैव आहे. आज जी काही दरोडेखोरी चालली आहे राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार-खासदार चोरले जात आहेत, विक्री सुरू आहे. आणि याला ऑपरेशन नाव देत आहेत. मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करत आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, चोरी तर होत आहेच, राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. त्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले आहेत. तो चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याचेही काही लोक म्हणत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, पक्ष न पाहता, ज्यांना ज्यांना असे वाटत आहे की राम मंदिरात चोरी होत आहे, ज्यांना जाब विचारायचा आहे, त्या सगळ्यांनी तिथे यावे. मी स्वतः आणि सगळे शिवसैनिक तिथे जाणार आहेत. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडले नाही ते सुद्धा येऊ शकतात. तिथे आपण ‘रामरक्षा आंदोलन’ करणार आहोत. हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालिसा सुद्धा म्हणू. जिथे जिथे राम मंदिर आहे, हनुमान मंदिर असेल तिथे प्रत्येक जण जाऊन आंदोलन करू शकतात, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

Uddhav Thackeray to Lead Protest Over Ram Temple Theft

महत्वाच्या बातम्या