विशेष प्रतिनिधी
मुंबई: CM Fadanvis राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आले. विधानसभेत महसूल विभागाने शेतीच्या कामांसाठी लागणारे गौणखनिज रॉयल्टीमुक्त उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, तर महिलांना स्वतंत्र ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर ओळख देणारे ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ सभागृहात मांडण्यात आले.CM Fadanvis
महसूलमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, शेतातील रस्ते दुरुस्ती तसेच शेतीच्या आवश्यक कामांसाठी लागणारे गौणखनिज शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, या गौणखनिजाचा व्यावसायिक वापर करण्यास सक्त मनाई असेल.CM Fadanvis
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना १५ दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाईल. तसेच, शेतीच्या कामासाठी आणि गौणखनिज वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे विधानसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी स्वागत केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत सरकारचे अभिनंदन केले. काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, राज्यातील कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान देणाऱ्या महिलांना कायदेशीर मान्यता मिळावी या उद्देशाने ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत सादर करण्यात आले. राज्यातील ८१ टक्क्यांहून अधिक महिला शेतीच्या कामात सक्रिय असल्या, तरी त्यांना आतापर्यंत स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा नव्हता.
या विधेयकानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख दिली जाणार असून, त्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार केला जाईल. तसेच, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजना, हक्क आणि विकासाच्या संधींचा थेट लाभ राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
State Government Announces Two Historic Decisions for Farmers: Free Minor Minerals for Agriculture, Independent Legal Recognition for Women Farmers
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी