विशेष प्रतिनिधी
नागपूर :- नागपूरमधील इमामवाडा डेपोमधून गुरुवारी मध्यरात्री एक अजब घटना समोर आली आहे. तेलंगणातील एका चोरट्याने एसटी महामंडळाची ‘शिवाई’ ई-बस चोरून पळवून नेली. विशेष म्हणजे, आगारामध्ये १४ कर्मचारी उपस्थित असतानाही सुरक्षारक्षकाच्या निष्काळजीपणामुळे आरोपीने मध्यरात्री ३:३० वाजताच्या सुमारास बस डेपोबाहेर काढली. मात्र, वाटेतच बसची चार्जिंग संपल्यामुळे चोराचा डाव फसला. electric bus
हायटेक ट्रॅकिंग सिस्टीम आणि नागपूर-अमरावती पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमरावतीच्या राजापेठ येथे आरोपीला चोरीच्या बससह अटक करण्यात आली आहे. विष्णू गणपती निलावार अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपीला ई-बसेस चोरण्याची सवय आहे. तो बस चोरून घेऊन जायचा आणि चार्जिंग संपल्यानंतर त्या बसमधील महागडे टायर्स आणि बॅटरी काढून विकायचा. electric bus
इलेक्ट्रिक चिपमुळे चोराचे लोकेशन सापडले
एसटी महामंडळाच्या एम. एच. ४९, बी. झेड-८२५८ या क्रमांकाच्या ई-बसमध्ये अत्याधुनिक ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसवलेली आहे. बस गायब झाल्याचे सकाळी ९ वाजता लक्षात येताच, आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांनी ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला. इंटरनेटवर रिअल-टाइम लोकेशन तपासले असता बस अमरावतीजवळ असल्याचे स्पष्ट झाले.नागपूर कंट्रोल रूमने तातडीने अमरावती पोलिसांना अलर्ट केले आणि राजापेठ पोलिसांनी वेळीच सापळा रचून आरोपी विष्णूला बससह ताब्यात घेतले.
Stealing an electric bus backfires; thief falls into police net as battery runs out!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी