Rupali Chakankar : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावरून नवा वाद; रूपाली चाकणकरांचा निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Rupali Chakankar नाशिकच्या कथित अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी चित्रपटात त्यांच्यावर आधारित व्यक्तिरेखा परवानगीशिवाय दाखवली जात असल्याचा आरोप करत निर्मात्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.Rupali Chakankar

या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद या रूपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. कथित अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यात रूपाली चाकणकर यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर चित्रपटाची निर्मिती होत असल्याने त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.Rupali Chakankar



प्रसारमाध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “या चित्रपटाचा विषय अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. एखाद्या जिवंत व्यक्तीचे पात्र चित्रपटात साकारण्यासाठी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. माझी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मी कायदेशीर पावले उचलणार आहे.”

खरात प्रकरणाच्या संदर्भात आपल्यावर आणि कुटुंबीयांवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे सांगत त्यांनी राजकीय विरोधकांवरही टीका केली. “या प्रकरणात माझ्यासह माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या माझ्या मुलालाही जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न झाला,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, बदनामीप्रकरणी आपण दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. आशा मिरगे यांच्यासह रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांना न्यायालयाच्या नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार असून, त्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, बदनामीकारक मजकूर आणि चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या काही युट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयात दाद मागणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

‘Maharashtra Epstein Files’ Sparks Fresh Controversy; Rupali Chakankar Warns of Legal Action Against Filmmakers

महत्वाच्या बातम्या