विशेष प्रतिनिधी
पुणे :- पुण्यातील दौंड तालुक्यातील गाडीमोडी परिसरातील एका गुऱ्हाळ काम करणाऱ्या २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.मात्र कायदेशीर कारवाईच्या भीतीने मालक आणि चालकाने मृतदेह कारच्या डिकीत टाकून तो रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी मालकसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Accident
उत्तर प्रदेशमधील रामू पासी असे मृत मजुरांचे नाव असून तो एप्रिल २०२६ पासून खामगाव येथील गुऱ्हाळावर मजुरीचे काम करत होता. १९ जुन २०२६ रोजी गुऱ्हाळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरु होते. यावेळी वाहन चालक आलम याने वाहन निष्काळजीपणे चालवून तेथे झोपलेल्या रामू याच्या अंगावर घातले.जेसीबीचे अवजड चाक अंगावरून गेल्यामुळे रामू या मजुराचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देऊन कायदेशीर प्रक्रिया करण्याऐवजी जेसीबी मालक अविनाश यादव याने गुऱ्हाळावर उपस्थित असलेल्या इतर मजुरांना आणि प्रत्यक्षदर्शीना “हा प्रकार कोणालाही सांगू नका, अन्यथा जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली होती. त्यांनी मृत रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत कोंबला. पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी हा मृतदेह वाघोली-राहू रस्त्यावर नेऊन टाकला.
रामूचा मृत्यू हा गुऱ्हाळावर नसून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला आहे, असा बनाव रचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गुऱ्हाळावरील ठेकेदार तमेरेज फरीदी यांनी रामू बेपत्ता झाल्याची माहिती उत्तर प्रदेशातील त्याच्या कुटुंबीयांना दिली. भाऊ बेपत्ता झाल्याचे समजत राजू पासी हा उत्तर प्रदेशातून तातडीने दौंड येथे आला. दोन दिवस त्याने परिसरात सर्वत्र शोध घेतला. अखेर 21 जून रोजी त्याने गुऱ्हाळावर जाऊन तेथील मजुरांकडे कसून चौकशी केली असता, काही प्रत्यक्षदर्शीनी धाडस करून घडलेला सर्व प्रकार राजूला सांगितला.
दरम्यान, राजू पासी याने तात्काळ यवत पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. यवत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्र फिरवली असता, संशयित आरोपींचा हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चालू आहे.
Body thrown from car to cover up accident; case registered against four people, including a jaggery unit owner.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी