Pune Ketan Aggarwal : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune Ketan Aggarwal लोहगड किल्ल्यावरून ढकलून २५ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.Pune Ketan Aggarwal

१८ जून रोजी घडलेल्या या घटनेत २० वर्षीय सिया गोयल आणि २२ वर्षीय चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून ढकलून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. केतन आणि सिया यांचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होता.Pune Ketan Aggarwal



पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सांकेतिक शब्द आणि संकेतांचा वापर आढळून आल्याने त्या संभाषणांचा अर्थ उलगडण्यासाठी तसेच तपास पुढे नेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

मात्र, बचाव पक्षाने या मागणीला विरोध करत, तपासासाठी पोलिसांना यापूर्वीच पुरेसा कालावधी मिळाल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune Ketan Aggarwal murder case: Siya Goyal and Chetan Chaudhary remanded to judicial custody till July 16

महत्वाच्या बातम्या