Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sassoon Hospital उपचारासाठी आलेल्या रुग्ण व नातेवाईकांसमोर धार्मिक हस्तपत्रिका वाटत ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याचा आणि हिंदू धर्माचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत कल्याणीनगरमधील एका दाम्पत्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.Sassoon Hospital

बंडगार्डन पोलिसांनी सुनील मलेपेरमिल वर्गीस (वय ५६) आणि प्रतिभा सुनील वर्गीस (वय ५५, रा. लुंकड स्काय लाउंज, कल्याणीनगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २९९ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भवानी पेठ येथील ऋषीकेश किशोर पांडे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे.Sassoon Hospital



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१० जुलै) सकाळी साडेअकराच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या ओपीडी क्रमांक ७२ समोर आरोपी दाम्पत्याने उपचारासाठी आलेल्या नागरिकांना एकत्र करून ख्रिश्चन धर्माविषयी प्रबोधन सुरू केले. तसेच ‘कृपासनम पेपर’ नावाच्या धार्मिक हस्तपत्रिकांचे वाटप केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी हिंदू धर्माचा जाणीवपूर्वक अपमान करत नागरिकांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्यासाठी भुलथापा व चमत्कारिक दावे केले. या प्रकारामुळे उपस्थितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत ऋषीकेश पांडे यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक आणि शासकीय रुग्णालयाच्या परिसरात घडलेल्या या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Couple booked for alleged religious preaching at Sassoon Hospital

महत्वाच्या बातम्या