विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadanvis माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पुण्यतिथीआधी म्हणजेच जानेवारीपूर्वीच अपघाती निधनाचा अंतिम अहवाल येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.CM Fadanvis
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाचा मुद्दा उपस्थित केला. अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी कुठपर्यंत आली? याची माहिती द्यावी, असे रोहित पवारांनी म्हटले. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाचे उत्तर देताना अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या चौकशीसंदर्भातील महत्त्वाची माहिती सभागृहाला दिली.CM Fadanvis
विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाला उत्तर देताना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जी काही घटना घडली आहे ते आपल्यातून निघून गेले. त्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सांगायचे झाले तर, त्याचे दोन तपास सुरू आहेत. एक सीआयडी करत आहे आणि दुसरे एएआयबी करत आहे. आपण सीबीआयला सुद्धा विचारले होते की, याचा तपास तुम्ही का घेत नाही आहात? त्यावर त्यांनी सांगितले की एएआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. आतापर्यंत सीआयडीने जो तपास केला आहे, त्यात वेगवेगळ्या गोष्टींसोबत पायलट सुमित कपूर यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांचे बँक खाते, गुंतवणूक, हे सगळे आपण तपासले असून त्यात कोणतेही संशयास्पद आढळून आले नाही. जे फुटेज मिळाले आहेत त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, एएआयबीचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची माहिती घेतली आहे की जे उपकरणं होती, त्यातून सगळी माहिती डाउनलोड करण्यात आली आहे. मी केंद्राशी देखील चर्चा केली आणि या घटनेचा रिपोर्ट किती दिवसांत मिळेल. त्यांनी सांगितले की जानेवारी पूर्वी हा रिपोर्ट येईल. हाच रिपोर्ट सर्वात महत्त्वाचा असणार आहे. रोहित पवार म्हणाले होते की 3-4 वर्ष लागतात, हे खरे आहे. पण आपण अमेरिकेची देखील एजन्सी घेतली आहे, दादांच्या पुण्यतिथीच्या आधी हा रिपोर्ट येईल अशी मी अपेक्षा करतो. आमचे सातत्याने यावर लक्ष आहे.
Final report on Ajit Pawar’s accidental death expected before death anniversary, says CM Fadanvis
महत्वाच्या बातम्या