विशेष प्रतिनिधी
मुंबई : आता मी ‘भाडे की टट्टू’ च्या ऐवजी ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसेल तर सुपारीबाज. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजले नाही, असा जाेरदार प्रतिहल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता चढविला.
मिसींग लिंकच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरून राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली हाेती. त्यांची नक्कलही केली हाेती. यावर जाेरदार प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, परवा मी विधानसभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की मिसिंग लिंकवर जो काही तो पूल आहे, ब्रिज आहे, टनेल आहेत, त्यांना एकही तडा गेलेला नसताना, कोणतेही नुकसान झालेले नसताना पैसे पाण्यात गेले म्हणणे सुरू झाले. हा माझा अपमान आहे? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता हिन्दीमध्ये बोललो, काहींना त्याचेही दुःख झाले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृतपणे बोलले पाहिजे. त्यानंतर मी अभ्यास केला आणि आता मी ‘भाडे की टट्टू’ च्या ऐवजी ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसेल तर सुपारीबाज. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजले नाही.
राज ठाकरे यांना सुनावताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले मिमीक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का भाषण केले? पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत. राजकारणात त्यांच्याकडून काही धोका नाही. पण आनंद आहे की ते राजकारणात आहेत. पण ते मिमीक्री आर्टिस्ट झाले असते तर एकाही स्टँडप कमेडियनला मार्केट राहिले नसते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दर वेळेसच आपला अंतिम आठवड्याचा प्रस्ताव कायदा आणि सुव्यवस्थेवर असतो. या सभागृहात अनेकवेळा चुकीचे आकडे मांडले जातात. महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची आकडेवारी जास्त आहे असे सांगितले जाते. क्राइम रेट कसा मोजला जातो? तर प्रती एक लाख लोकसंख्येनुसार मोजायचा असतो. आपण आता जर विचार केला, देशातल्या राज्यांमध्ये आपण 7 व्या क्रमांकावर आहोत. गुन्हेगारीत आपले राज्य पहिले असे म्हणणे चुकीचे आहे. महिलांच्या विरोधात जे अपराध आहेत, त्यात 9 व्या क्रमांकावर आहोत. लहान बालकांच्या विरोधातील गुन्हे, यात आपण 7 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण जर बघितले तर जे काही रेपचे गुन्हे आहेत, त्यात महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे. मी कुठल्याही गोष्टीचे समर्थन नाही करते. महाराष्ट्र आजही सुरक्षित आहे.
फडणवीस म्हणाले, मे 2025 ते मे 2026 या कालावधीत जर आपण पाहिले तर विनयभंग 374 ने कमी, दुखापत 187 ने कमी, जबरी चोरी 271 ने कमी, घरफोडी 295 ने कमी, चोरी 394 ने कमी आणि गुन्हे उघडकीस येण्याचे जे प्रमाण आहे ते 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एक समाधान यात आहे की, पूर्वी देखील गुन्हे घडत होते. पण जो काही समाज आहे त्याच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला जात नव्हता. आता गुन्हा नोंदवण्यात वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत, त्यात नातेवाईकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेव्हा त्यांच्यावर घरून दबाव असायचा. मात्र आता गुन्हा नोंदवला जात आहे. समाज सुधारायचा असेल तर घरचा दबाव संपुष्टात आला, तर मोठा परिणाम होईल. 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
CM launches sharp counterattack on Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या