डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 10 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत अनेक नियमित आणि विशेष एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

प्रतिकूल हवामान आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले, तरी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहेत. रेल्वेचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथके 24 तास राबत असून रेल्वेचे तिन्ही मार्ग लवकरात लवकर सुरक्षित करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ऐन पावसाळ्यात प्रवाशांचा मनस्ताप टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी गाडीच्या वेळेची आणि सद्यस्थितीची खात्री करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक, NTES (National Train Enquiry System) अॅप किंवा मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरील अपडेट्स पाहावेत, जेणेकरून प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टळेल.



दिनांक 10 जुलै ते 17 जुलै कालावधीत दररोज धावणाऱ्या खालील गाड्या रद्द

गाडी क्रमांक 17317 हुबळी – दादर एक्सप्रेस

गाडी क्रमांक 17318 दादर- हुबळी एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22943 दौंड इंदूर एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हैदराबाद एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22731 हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुणे डेक्कन क्वीन

गाडी क्रमांक 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्सप्रेस

गाडी क्रमांक 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस

गाडी क्रमांक 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

गाडी क्रमांक 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल

गाडी क्रमांक 22158 चेन्नई एग्मोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मे

वेगवेगळ्या तारखांना सुटणाऱ्या या गाड्या रद्द

गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (दिनांक 10 जुलै ते 17 जुलै 2026 पर्यंत)

गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (दिनांक 9 जुलै ते 17 जुलै)

गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस ((दिनांक 10 जुलै ते 17 जुलै 2026 पर्यंत)

गाडी क्रमांक 20496 हडपसर- जोधपूर एक्सप्रेस (11 ते 17 जुलैपर्यंत)

गाडी क्रमांक 11028 सातारा – दादर एक्सप्रेस (दिनांक 11, 13 आणि 14 जुलै)

गाडी क्रमांक 11027 दादर- सातारा एक्सप्रेस (दिनांक 10, 12, 13 आणि 17 जुलैपर्यंत)

गाडी क्रमांक 11041 दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस (दिनांक 9, 11, 14, 15, 15 जुलै)

गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी- दादर एक्सप्रेस (दिनांक 10, 12, 15, 16, 17 जुलै)

  • या विशेष गाड्या रद्द

गाडी क्रमांक 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस (दिनांक 10 ते 17 जुलै पर्यंत)

गाडी क्रमांक 01080 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दिनांक 12 जुलै ते 17 जुलै पर्यंत)

गाडी क्रमांक 01415 पुणे – गोरखपूर एक्सप्रेस (दिनांक 10 ते 15 जुलै पर्यंत)

गाडी क्रमांक 01416 गोरखपूर – हडपसर एक्सप्रेस

गाडी क्रमांक 01416 गोरखपूर – हडपसर एक्सप्रेस (दिनांक 11 ते 16 जुलैपर्यंत)

गाडी क्रमांक 01431 पुणे – गाझीपूर सिटी एक्सप्रेस (दिनांक 10 आणि 14 जुलै)

गाडी क्रमांक 01432 गाझीपूर सिटी – हडपसर एक्सप्रेस (12 आणि 16 जुलै रोजी)

गाडी क्रमांक 01491 पुणे – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (दिनांक 10 जुलै रोजी)

गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन – पुणे एक्सप्रेस (दिनांक 11 जुलै रोजी)

Deccan Queen among several trains cancelled till July 17 after landslides hit Lonavala Ghat

महत्वाच्या बातम्या