विशेष प्रतिनिधी
मुंबई : D.B. Patil नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी दिबा पाटील नामकरण संघर्ष समितीच्या वतीने पनवेल ते विधान भवन असा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलन रोखत मोठी कारवाई केली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली असून परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.D.B. Patil
मोर्चा रोखल्यानंतर आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची वाहने अडवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिक चिघळली. त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना उचलून पोलिस वाहनांमध्ये बसवून ताब्यात घेतले.D.B. Patil
दरम्यान, झालेल्या गोंधळात दोन महिला आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोर्चा पुढे जाऊ दिला नाही. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिबा पाटील यांच्या नावासाठी अनेक वर्षांपासून विविध संघटनांकडून आंदोलन सुरू असून, आजच्या घटनेमुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी प्रशासन किंवा सरकारकडून पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
D.B. Patil Naming Protest Turns Violent in Panvel; Protesters Detained After Clash with Police
महत्वाच्या बातम्या