विशेष प्रतिनिधी
मुंबई : येत्या ७ सप्टेंबरला ठाकरे गटाचे तब्बल १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा दावा सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ याने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओद्वारे केला आहे. Hindustani Bhau
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊने थेट उद्धव ठाकरेंना उद्देशून इशारा दिला आहे. तो म्हणाला, “उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम! मी याआधीही बोललो होतो, सांभाळा… नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मार्गावर आहेत. सचिन भाऊ अहिर हा पहिला बॉम्ब फुटला आहे आणि सप्टेंबरपर्यंत अजून खूप काही जाणार आहे. ७ सप्टेंबर ही तारीख आठवणीत ठेवा.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
खासदार संजय राऊतांच्या ‘तुडवा ऑपरेशन’ या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदुस्थानी भाऊने म्हणाला, “तुमचा अनिल कपूर काय बोलतोय? आता ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळ, अरुण भाई गवळी उर्फ डॅडी यांचे नाव ऐकले आहे ना? बाळासाहेब म्हणायचे, तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आहे. हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आता तरी तोंड बंद करायला सांगा, नाहीतर याचेच ‘तुडवा ऑपरेशन’ चालू होईल.”
Hindustani Bhau Claims 15 Thackeray MLAs, 25 Corporators to Quit Party on September 7
महत्वाच्या बातम्या