विशेष प्रतिनिधी
मुंबई : Transport Minister डोमिसाईल सर्टिफिकेट असल्याशिवाय यापुढे कोणालाही दुचाकी किंवा कार खरेदी करता येणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.Transport Minister
शिवसेनेचे (शिंदे गट) चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांनी मंगळवारी (7 जुलै) प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राज्यातील अवैध बाईक टॅक्सीचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. ज्यानंतर या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तरपणे उत्तर दिले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी बेकायदेशीरपणे बाईक, टॅक्सी चालवणाऱ्यांवर चाप लावण्याकरिता राज्य शासन पाऊले उचलत असल्याची घोषणा तर केलीच.Transport Minister
आमदार दिलीप लांडे यांनी अवैध बाईक आणि टॅक्सी चालकांचा मुद्दा विधानसभेत मांडताना म्हटले की, रस्त्यांवर बेकायदेशीर वाहनांचा आणि विनापरवाना चालणाऱ्या बाइक – टॅक्सींचा सुळसुळाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे या चालकांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसतात, ना कोणते ड्रायव्हिंग लायसन्स असते आणि त्यांची कोणतीही पोलीस पडताळणी करण्यात आलेली असते. यामुळे राज्यातील महिला आणि विद्यार्थी सुरक्षित नाहीत. त्यामुळे अशा चालकांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली.
त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात बाईक, टॅक्सी सेवेला परवानगी देत असताना मंत्रिमंडळाने केवळ ईव्ही बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. कारण पेट्रोल बाईक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आल्यास त्यामुळे प्रदूषण वाढण्याचा धोका होता. ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांना बाईक टॅक्सीसाठी तात्पुरता परवाना देण्यात आला होता. मात्र यापैकी एकाच कंपनीने तो परवाना घेतला. काही कालावधीनंतर आमच्या लक्षात आले की, या कंपन्यांनी सरसकट पेट्रोल आधारित बाईक टॅक्सी रस्त्यावर आणल्या होत्या. यानंतर आरटीओने अशा बाईकवर कारवाई केलेली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
तसेच, आजघडीला मुंबई आणि महानगर क्षेत्रात चार ते साडे चार लाख अवैध बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत. शासनाला एक रुपयाचाही महसूल या माध्यमातून मिळत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेतली, त्यात काही निर्णय घेण्यात आले आहेत. तर, महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा, यासाठी बाईक टॅक्सीच्या नियमात बदल केले आहेत. यापुढे बाईक टॅक्सी चालवायची असेल तर प्रतिदिन पाच रुपये शासनाला द्यावे लागणार आहेत. तसेच प्रत्येक राईडमागे दोन टक्के रक्कम कापली जाईल, जी कल्याणकारी योजनांसाठी वापरली जाईल. जे लोक बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवत आहेत, त्यांनाही चाप लावला जाणार आहे. यापुढे अधिवास प्रमाणपत्र असलेल्यांना बाईक टॅक्सी चालविण्याची परवानगी देण्यात येईल. यामुळे अवैध वाहतुकीला लगाम लागेल, तसेच शासनालाही महसूल मिळेल, अशी व्यवस्था केली जात असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
No Domicile Certificate, No Vehicle Purchase in Maharashtra: Transport Minister
महत्वाच्या बातम्या