Pune–Mumbai : पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील वाहतूक पुन्हा सुरू; सुरक्षा तपासणीनंतर एमएसआरडीसीचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune–Mumbai  मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आलेल्या पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक रोडवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. व्यापक सुरक्षा उपाययोजना आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा निर्णय घेतला.Pune–Mumbai

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, सलग सुरू असलेला मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता अशा प्रतिकूल परिस्थितीतही पथकांनी अखंडपणे काम करून मार्ग सुरक्षित करण्याचे काम केले.Pune–Mumbai



यावेळी दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यात आला. विशेष यंत्रसामग्रीच्या साहाय्याने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला. तसेच तांत्रिक तज्ज्ञांनी टनेल क्रमांक २ आणि लगतच्या उताराची सखोल पाहणी करून सैल दगड किंवा मातीमुळे कोणताही धोका नसल्याची खात्री केली.

ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दाट धुके, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे हवाई पाहणीवर मर्यादा आल्या.

सर्व आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात आल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाने जारी केलेल्या वाहतूक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या