Fake milk : मंचर परिसरातील कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश, ५०० लिटर रसायने, शॅम्पूसदृश पदार्थ मिसळून केले जाते हजार लिटर दूध,

विशेष प्रतिनिधी

पुणे : Fake milk  उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे.Fake milk

प्राथमिक तपासात प्रति १,००० लिटर दुधामध्ये सुमारे ५०० लिटर रासायनिक द्रव्ये तसेच शॅम्पूसदृश पदार्थ मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवारी झालेल्या या कारवाईत १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, दूध व खव्याचे नमुने तसेच महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.Fake milk

पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला दूध भेसळीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सुमारे ३० अधिकारी व कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे २० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.Fake milk



शिक्रापूर, पिंपळगाव आणि अवसरी येथे धाडी टाकून दूध आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. तसेच आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रांवरही कारवाई करण्यात आली. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संशयितांकडून महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.

प्राथमिक तपासात मंचर हे या दूध भेसळ रॅकेटचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा केला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही संशयित अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासाच्या हितासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे जाहीर केलेली नाहीत.

दूध हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक घटक असल्याने या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, भेसळीचे जाळे किती मोठे आहे आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास सुरू असून, या प्रकरणाची अधिक माहिती पोलीस अधीक्षक पत्रकार परिषदेत देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Fake milk racket busted; 500 litres of chemicals, shampoo-like substances mixed per 1,000 litres of milk

महत्वाच्या बातम्या