विशेष प्रतिनिधी
मुंबई: Warkaris आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.Warkaris
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकर यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.Warkaris
आबिटकर म्हणाले, “वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, यामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.”
“वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवताना कोणतीही उणीव राहू नये. वारी कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी पंढरपूर येथील स्थानिक डॉक्टरांची उपलब्धता राहण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. पालखी मार्गावरील तसेच शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयांतील दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत. खासगी डॉक्टरांना आरोग्य सेवा देण्याचे आवाहन आपण करतो, त्यामुळे सरकारी डॉक्टरांनीही अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने सेवा द्यावी. वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात सार्वजनिक आरोग्य विभाग कुठेही कमी पडता कामा नये.”, असे त्यांनी सांगितले.
Air ambulance service introduced for Warkaris for the first time
महत्वाच्या बातम्या