Moshi garbage : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू, शनिवारी आठ मृतदेह काढले बाहेर

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : Moshi garbage मोशी येथील कचऱ्याच्या डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (८ जुलै) मोशी कचरा डेपो येथे ही दुर्घटना घडल्यानंतर गुरुवारी (९ जुलै) पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. तर, शनिवारी (११ जुलै) आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले.Moshi garbage

कचऱ्याचा ढिगारा ढासळून इमारत कोसळल्यानंतर अडकलेल्या आठ लोकांचे मृतदेह शनिवारी बचाव पथकाने बाहेर काढले होते. त्यानंतर या इमारती व्यतिरिक्त अन्यत्र बेपत्ता असणारे कर्मचारी वामन कसबे यांचा मृतदेह रात्री एक वाजता सापडला असून, या घटनेमध्ये नऊ लोकांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे.Moshi garbage



गेल्या 85 तासापासून सुरू असलेल्या बचाव कार्यामध्ये आत्तापर्यंत पाच लोकांनी स्वतःचा जीव वाचवला तर नऊ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये नऊ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यानंतर देखील शोध मोहीम पूर्णपणे बंद करण्यात आली नसून या घटनेमध्ये अद्यापही कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

मोशी कचरा डेपो येथे बुधवारी (८ जुलै) दुपारी एक ते दोनच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून अँटनी लोरा या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळली. हजारो टन कचरा या इमारतीवर आल्याने ही इमारत पूर्णपणे पडली. ही इमारत पडल्यानंतर तातडीने पोलिस, अग्निशमन दल, महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनेचे गांभीर्य पाहता एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. या इमारतीमध्ये एकूण २३ कामगार होते. इमारत कोसळताना त्यातील अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला या पाच कामगारांनी उड्या मारून घटनास्थळावरून पळत आपला जीव वाचविला. मात्र, १८ कामगार इमारतीच्या आतमध्ये अडकले होते.

एनडीआरएफला या कामगारांना काढण्यात अडचणी भासू लागल्याने भारतीय सैन्य दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही दलांनी प्रयत्न करून इमारतीच्या आत अडकलेल्या सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह, विजय सपकाळ या कामगारांना बाहेर सुखरूप काढले. तर गुरुवारी (९ जुलै) पहाटे भूषण पाटील, महेश राऊत यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

मात्र, गुरुवारी सकाळी भावेश वाणी यांना बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, गुरुवारी आणि शुक्रवारी (१० जुलै) दोन दिवस इमारतीच्या बाजूचा कचरा हटवून आणि इमारतीचा स्लॅब फोडून इतर कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, इमारतीच्या आसपासच्या मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

गुरुवारी दुपारपासून ते शनिवारी (११ जुलै) दुपारपर्यंत हा कचरा हटविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अक्षय सावंत या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर, पाच वाजण्याच्या सुमारास सुनील कोकरे या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, रणजीत पाटील, नागेश गायकवाड यांचे मृतदेह काढण्यात आले. मात्र, वामन कसबे यांचा मृतदेह सापडला नाही. कसबे यांनी प्रवेशद्वारावर प्रवेश केला. तशी ऑनलाइन नोंद केली. मात्र, मुख्य प्रशासकीय इमारतीत गेल्याची त्यांची नोंद नाही. त्यामुळे ते नक्की ढिगाऱ्याखाली कुठे अडकले आहे, याचा अंदाज बचाव पथकाला येत नाही. त्यांच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य दलाने सुरुवातीला इमारतीच्या सभोवतालचा सर्व कचरा जेसीबीच्या साह्याने बाहेर केला. त्याचप्रमाणे जो कचरा जेसीबीच्या साह्याने बाहेर काढता येत नाही तो कचरा हाताने बाजूला केला. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने इमारतीचा कोसळलेला स्लॅब फोडला. त्यातून रस्ता तयार करून ज्या ठिकाणी कामगार आहेत, त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत कामगारांना बाहेर काढले.

बुधवारी (८ जुलै) दुपारी एक ते दोनच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत पडल्याची घटना घडली. त्यातील नऊ कामगारांना गुरुवारी (९ जुलै) सकाळी बाहेर काढले. तर एका मृत कामगाराला बाहेर काढले. त्यानंतर शुक्रवारी (१० जुलै) एकही कामगाराला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले नाही. कचरा जास्त आहे, यंत्रणा कमी आहे, अशी उत्तरे देत अधिकाऱ्यांनी अडकलेल्या कामगारांना मृत्यूच्या दारात सोडले. त्यामुळे शनिवारी (११ जुलै) सापडलेले सात कामगारांचा मृत्यू झाला होता. आठवा कामगार अद्यापही सापडलेला नाही. तो जिवंत आहे का मृत, जिवंत असेल तर त्याची प्रकृती कशी आहे याची माहिती कुणालाही नाही. या कामगारांच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे.

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळल्यानंतर कचरा आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी पाच नागरिकांनी उद्या मारून स्वतःचा जीव वाचविला होता. तर, नऊ नागरिकांना बचाव पथकाने सुखरुख बाहेर काढले होते. त्यांनंतर शनिवारी बचाव पथकाने सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. एक कामगार अद्यापही सापडलेला नाही. या कामगाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Nine workers dead in Moshi garbage depot accident, eight bodies recovered on Saturday

महत्वाच्या बातम्या