विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kanhaiya Kumar अमित शाह यांनी एका पायावर उभे राहायला सांगितले तर ते तसे करतील. डोक्यावर उभे राहायला सांगितले तरी ते तसेच करतील. त्यांच्याकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी केली.Kanhaiya Kumar
पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका करत राजकीय स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराला “महापाप” आणि “जघन्य अपराध” असे म्हणत कन्हैया कुमार यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. प्रभू श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने या प्रकरणात राजकारण न करता सत्य समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले.Kanhaiya Kumar
भाजप समर्थक “रामांना आम्ही आणले” असा दावा करत देणगीवरील प्रश्न टाळत असल्याचा आरोप करत त्यांनी, “राम त्रेतायुगात आले होते, त्यांना आजचे नेते घेऊन आलेले नाहीत. श्रद्धेच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळ सुरू आहे, अशी टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधत कन्हैयाकुमार म्हणाले, भूमिपूजन आणि मंदिर उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी घेण्यात आली, मात्र कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर मौन बाळगण्यात आले. राम मंदिर ट्रस्ट तातडीने बरखास्त करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. केवळ नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नसून, अयोध्येपासून दिल्लीपर्यंत या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरच फसवणुकीचे आरोप असल्याचा दावा त्यांनी केला.
धर्माच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा काँग्रेसचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत कन्हैया कुमार म्हणाले की, पक्ष शिक्षण, रोजगार, पेपरफुटी, महागाई, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणार आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारले असता, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत काँग्रेस कोणालाही आदेश देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील राजकारण संघर्ष करणारे आणि सत्तेसमोर शरण जाणारे अशा दोन विचारांमध्ये विभागले गेले असल्याचा दावाही त्यांनी केला.
Eknath Shinde has lost his political self respect, claims Kanhaiya Kumar
महत्वाच्या बातम्या