सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हलविले, अभिजीत दीपके यांचे उपोषण सुरू

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उपोषणाच्या 21 व्या दिवशी शनिवारी सकाळीच दिल्ली पोलिसांनी थेट कारवाई करत सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून थेट हलवण्यात आले नेले. ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आणि कडक पोलीस बंदोबस्तात सकाळी सव्वासात वाजता करण्यात आली. मात्र, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेले, असा आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. दिल्ली हायकोर्टाचे आदेश आणि त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांनी रुग्णालयात नेले आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. अभिजीत दीपके यांनी आता उपोषण सुरू केले आहे.



सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण सुरू केले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा नीट 2026 चा पेपर लीक झाल्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला आणि जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याविरोधात देशात संतापाची लाट उसळली होती. याविरोधात काँक्रोज जनता पार्टीने याविरोधात आंदोलन करत देशात आवाहन केले आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या उपोषणाची दखल 20 दिवसांपर्यंत घेण्यात आली नव्हती. मात्र, त्यांच्या प्रकृतीवरून दिल्ली हायकोर्टात याचिक दाखल करण्याचे चातुर्य दाखवून वांगचुक यांना हटवण्याची तयारी शुक्रवारी सुरू झाली, हे सर्वांच्या लक्षात आले होते. मात्र, हे नाट्य शनिवारी सकाळीच घडेल, याची कुणालाच कल्पना नव्हती.

आंदोलनाच्या 20 दिवसांत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड होत होते शिवाय त्यांचे वजन 8 किलोंनी घटले होते. एवढे होऊनही केंद्र सरकार आंदोलनाची दखल घेण्यात तयार नव्हते. अखेर शनिवारी सकाळी पोलिसांनी कारवाई करत वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयात नेल्याचे दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी हुकूमशहा – अभिजीत दिपके

या घटनेनंतर काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून जबरदस्तीने फरफटत नेले तसेच मलाही मारहाण करत कसा जातोस जंतर मंतरवर असा दम दिल्याचा दावाही अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्याचवेळी हे दिल्ली पोलीस नाहीत तर आरआरएसचे गुंडे आहेत, असा आरोप करत देशात लोकशाही नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशहा आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच देशात या घटनेचा लोकांनी शांततेत निषेध करण्याचे आवाहन, अभिजीत दिपके यांनी केले आहे.

Sonam Wangchuk Shifted from Protest Site, Abhijeet Deepke Continues Hunger Strike

महत्वाच्या बातम्या